Latest

Navaratri Fasting – उपवासाचा टेस्टी खजिना : शाबुदाण्याचे पराठे; नक्की ट्राय करा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी डिजिटल : नवरात्रीमध्ये अनेकांचे उपवास असतात. (Navaratri Fasting) पण उपवास नकोसा वाटू लागतो ते तेच तेच पदार्थ खाऊन दर दिवशी कंटाळा आला असेल तर अनेक नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज वाचा शाबुदाण्याचे पराठे कसे बनवायचे. (Navaratri Fasting)

साहित्य : 

शाबुदाणा : 3 मोठे चमचे

पाणी : सव्वा कप

बटाटा : 1 कप (उकडून आणि मॅश करून )

सैंधव मीठ : चवीपुरते

हिरवी मिरचीचे काप : चवीनुसार

जिरे : अर्धा चमचा

शेंगदाणे : 3 मोठे चमचे (भाजलेले आणि कूट करून )

कोथिंबीर : बारीक चिरलेली

तूप : भाजण्यासाठी

कृती :

अर्धा कप शाबुदाणे 5-6 तास भिजवून घ्यावेत. उरलेल्या शाबुदाण्याची मिक्सरवर बारीक पूड करून घ्यावी. यानंतर बटाटा मॅश करून घ्यावा. जीरे, हिरवी मिरची, शाबुदाणा पूड आणि शेंगदाण्याचे कूट, भिजवलेला शाबुदाणा, कोथिंबीर, मीठ टाकून मळून घ्यावं. बटर पेपरवर ठेवून कणिक थापून घ्यावी. त्यापूर्वी बटर पेपरच्या तळाशी तूप किंवा तेल लावावे. थापून झाल्यावर हलक्या हाताने तव्यावर टाकून घ्यावे. तव्यावर टाकताना पराठे मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी. बाजूने तूप सोडून भाजून घ्यावे. हे तुम्ही दहीसोबत खाऊ शकता.

SCROLL FOR NEXT