Latest

Nashik : अवकाळीने दाणादाण, निफाड‌ तालुक्यात शेतकरी हैराण

गणेश सोनवणे

नाशिक (उगांव. ता निफाड‌) : पुढारी वृत्तसेवा

रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास निफाड तालुक्याच्या जवळपास सर्वच भागात अवकाळी पाऊसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. वाऱ्याच्या वेगामुळे बहुसंख्य भागात झाडे उन्मळून पडली आहेत.  विजांच्या तारा तुटून विजपुरवठाही खंडीत झाला आहे. अवकाळीच्या भक्ष्यस्थानी द्राक्ष, कांदा, गहु, मका ही पिके आहेत.

निफाडच्या उत्तर भागात शिवडी, उगांव, वनसगांव, सोनेवाडी खुर्द तसेच चांदोरी, सायखेडा, शिंगवे परिसरात वादळी वारे व वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.  या अवकाळी पावसाने शेतात काढून ठेवलेला गहु भिजला आहे.  शेतात बेदाणा शेडचेही नुकसान होऊन बेदाणा भिजला आहे.  काढणीस आलेल्या कांद्यासह अंतिम टप्यातील द्राक्षबागांनाही धोका वाढला आहे. शिवडी -सोनेवाडी रोडवर दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतुक बंद झाली होती. सकाळी ती पुर्ववत करण्यात आली. शिवडी गावालगत निफाड रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने वीजतारा तुटल्या आहेत.  गावातील विजपुरवठाही खंडीत झाला आहे, तो सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT