सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा वर्गातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.  File Photo
Latest

Nashik News | विद्यार्थीनीचा वर्गातच मृत्यू, नाशिकमधील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

नाशिकच्या सिडको परिसरातील एका शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीचा वर्गातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चक्कर येऊन बेंच वरुन खाली पडून या विद्यार्थ्यानीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुलीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. 

दिव्या त्रिपाठी असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. वर्गात चक्कर येऊन पडल्याने तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दरम्यान शाळेत अशाप्रकारे केवळ चक्कर येऊन मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे नक्की चक्कर येऊनच मृत्यू झाला आहे की यामागे आणखी काही कारण आहे अशी शंका उपस्थित होत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT