Latest

Nashik News : गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरच्या धडकेत सहावर्षीय बालकाचा मृत्यू

गणेश सोनवणे

सिडको : पुढारी वृत्तसेवा; गणेश विसर्जन मिरवणुकीत चुंचाळे शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर खाली सापडून एका सहावर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेत त्याचे वडील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  (Nashik News)

अंबड औद्योगिक वसाहतीतील चुंचाळे शिवार पोलिस चौकीच्या हद्दीत चुंचाळे गाव भागात ट्रॅक्टरवर गणेश विसर्जन मिरवणूक सुरु होती. यावेळी रात्री १० वाजेच्या सुमारास येथील कृष्णा स्विट्स कडून दातीर नगर भागाकडे जाणा-या उतार रस्त्यावर ट्रक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत मिरवणुक पाहणा-या गणेश भक्तांवर जाऊन ट्रक्टर धडकला. यात रुद्रा राजू भगत हा सहा वर्षीय मुलगा ठार झाला. तर त्याचे वडील राजू भगत (रा. मारुती संकुल. दत्तनगर) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबड चुंचाळे पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT