Latest

नाशिक क्राईम : कोणार्कनगरला तरुणीचा विनयभंग

अंजली राऊत

कोणार्कनगरला तरुणीचा विनयभंग

नाशिक : कोणार्कनगर परिसरात एकाने तरुणीस अडवून तिला शिवीगाळ, दमदाटी करीत विनयभंग केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पीडितेने आडगाव पोलिस ठाण्यात संशयित लतेश अग्रवाल विरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. संशयिताने २५ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास विनयभंग केल्याचे पीडितेने सांगितले.

जुना कथडा परिसरात घरफोडी

नाशिक : जुना कथडा परिसरात चोरट्याने वीरसिंह खंजू जाटव (२८) यांच्या घरात घरफोडी करून चोरट्याने १५ हजार ४०० रुपयांची रोकड लंपास केली. शनिवारी (दि.२७) सायंकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी जाटव यांच्या फिर्यादीनुसार, भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.

किराणा दुकान फोडले

नाशिक : शिंदेगाव परिसरात गणेश होलसेल किराणा दुकान फोडून चोरट्याने १ लाख २ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २७ ते २८ मे दरम्यान घडली. दिलीप भीमाजी झाडे (६३, रा. सिन्नर) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील तेल डब्बे व पाऊच लंपास केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात घरफाेडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT