Latest

Nashik : ‘पुढारी’वर स्नेहसदिच्छांची उधळण, वर्धापन दिन साेहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; निर्भीड आणि नि:पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून अल्पावधीत वाचकांच्या हृदयस्थानी विराजित झालेल्या दै. 'पुढारी' नाशिक आवृत्तीच्या वर्धापनदिनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्नेहसदिच्छांची उधळण केली. नाशिक शहरासह जिल्ह्यातून आलेल्या वाचकांची मोठ्या संख्येने उपस्थिती हे सोहळ्याचे वैशिष्ट्य राहिले.

गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक सभागृहात आयोजित या सोहळ्याप्रसंगी आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग, बांधकाम, क्रीडा, कृषी, पत्रकारिता आदी क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती राहिली. नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे, युनिट हेड राजेश पाटील, जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे, वितरण विभागाचे शरद धनवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

सविस्तर वृत्त उद्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT