Latest

नाशिक : म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्षपदाचा पदभार बडगुजरांनी स्वीकारला

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी टाकलेल्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही. महापालिका कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सभागृह आणि सभागृहाबाहेर सातत्याने आवाज उठवेन, असे आश्वासन नाशिक महापालिकेच्या शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी दिले.

नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी वसूबारसच्या मुहूर्तावर अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमावेळी ते बोलत होते. शिवसेना उपनेते माजी मंत्री तथा कर्मचारी सेनेचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, माजी गटनेते विलास शिंदे, माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांच्यासह कामगार संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शिवसेनेने नेहमीच कामगारांच्या हिताची भूमिका घेऊन त्यांच्या आर्थिक विकासाला हातभार लावला आहे आणि त्यामुळेच आज ते सर्व सुखी जीवन जगत आहेत, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. आता म्युनिसिपल कर्मचारी सेनेला बडगुजर यांच्या रूपाने धडाडीचे नेतृत्व लाभले असून, ते कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवतील, असा विश्वास बबनराव घोलप यांनी व्यक्त केला. करंजकर, गायकवाड, पांडे, शिंदे यांनीही मनोगतात बडगुजर यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, बाळासाहेब कोकणे, दीपक बडगुजर, योगेश बेलदार, सुभाष गायधनी, महेंद्र बडवे, देवा जाधव, मसूद जिलानी, नाना पाटील, विशाल सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी कामगार सेनेचे पदाधिकारी नंदू गवळी, रावसाहेब रूपवते, संजय गोसावी, अंबादास विधाते, दीपक लांडगे, राजेंद्र सोनवणे, विशाल घागरे, तुषार ढकोलिया, उत्तम बिडगर, सोमनाथ कासार, योगेश येडेकर, नंदू खांडरे, मनोज थोरमिसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT