Latest

नाशिक : खाजगी क्लास न लावता शाळेच्या मार्गदर्शनावरच दहावीमध्ये अनुष्काने मिळवला प्रथम क्रमांक

अंजली राऊत

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. कोणताही खासगी क्लास न लावणाऱ्या या विद्यालयाची अनुष्का लक्ष्मण थोरे हिने (९२.४०) टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी तिचे कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

विद्यालयात दिव्येज ठाकरे (९१.६०) द्वितीय, प्रमोद जाधव (९०.४०) व श्रद्धा गांगुर्डे (९०.४०) यांना समान गुण मिळाल्याने ते दोघे तृतीय तर सोनालकुमारी रबारी (८८.००) गुण मिळवीत चतुर्थ क्रमांकावर आली आहे. विशेष म्हणजे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली अनुष्काने शाळे व्यतिरिक्त एकही खासगी क्लास लावलेला नव्हता. शाळेत शिक्षकांनी दिलेला अभ्यास अन स्वतः अभ्यास करण्याची चिकाटी या दिनचर्येत तिने यशाला गवसणी घातली आहे. अनुष्काचे वडील लक्ष्मण (राजू) व आई अर्चना यांचे तिला सतत पाठबळ मिळाले आहे. अनुष्काच्या यशाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, संस्थेच्या अध्यक्षा मीना कोतवाल, समन्वयक राहुल कोतवाल, सचिव दत्तात्रेय बारगळ आदींनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT