Latest

Narhari Jirwal : आता माझी भूमिका वेगळी, आमदार अपात्रतेवरून नरहरी झिरवाळ यांचे घूमजाव

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आमदार अपात्रतेच्या प्रश्नावर माझा संबंध काय आहे? तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना माझी भूमिका वेगळी होती. सद्यस्थितीमध्ये माझी भूमिका वेगळी असल्याने या प्रश्नावर मी जास्त बोलणार नाही, असे सांगत आमदार अपात्रतेसंबंधी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घूमजाव केले. (Narhari Jirwal)

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांना निकाल देण्यासाठी अवघा ४८ तासांचा कालावधी शिल्लक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांचे काय होणार याचे उत्तर निकालानंतर मिळणार आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रासह देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.८) जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती लावणाऱ्या झिरवाळ यांना या अनुषंगाने पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर बोलताना झिरवाळ यांनी मविआ सरकारमध्ये असताना त्यावेळची आपली भूमिका वेगळी होती. सध्या आपली भूमिका वेगळी असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला. दरम्यान, मुंबईमध्ये काही महिला पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहे. याबाबत झिरवाळ यांना विचारले असता हा प्रकार निंदनीय आहे. पोलिसांवर राज्यातील सर्व नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्याच पोलिस दलात अधिकाऱ्यांकडून असे कृत्य घडले असल्यास त्याचे समर्थन हाेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया झिरवाळ (Narhari Jirwal) यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT