Latest

Nargis Fakhri : मी दिखावा करणारी नाही!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन: रणबीर कपूरच्या 'रॉकस्टार' या चित्रपटात भूमिका साकारून चर्चेत नर्गिस फाखरी ( Nargis Fakhri ) सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. एका मुलाखतीला खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, माझे खासगी आयुष्य खासगीच ठेवायचे आहे. सोशल मीडियामुळे आता सेलिब्रिटींचे आयुष्य खुल्या पुस्तकाप्रमाणे झाले आहे. आम्ही सर्वजण इथे न्यूड आहोत.

मध्यंतरीच्या काळात ती अभिनेता आणि निर्माता उदय चोप्राला डेट करत असल्याची चर्चा होती. त्याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमेरिकेतील एका उद्योजकासोबत तिचे नाव जोडले जात आहे. ती म्हणाली, मी प्रामाणिक आणि कुठलाही दिखावा न करणारी व्यक्ती आहे.

लोकांनी माझ्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्याला माझा आक्षेप नाही. पण कामाव्यतिरिक्त फक्त त्यावरच लक्ष केंद्रित केले जाते, याचे मला फार वाईट वाटते. माझ्या खासगी आयुष्याबद्दल बोलण्यासाठी मी लाजत नाही. ( Nargis Fakhri )

SCROLL FOR NEXT