Latest

Narayan Murti : आठवड्यातून किमान ७० तास काम करायला हवे : नारायण मूर्ती

सोनाली जाधव

नवी दिल्ली : भारताला प्रगती करायची असल्यास तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करायला हवे, असा सल्ला इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी दिली. इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय • अधिकारी मोहनदास पै यांच्यासोबत संवाद साधताना ते म्हणाले की, तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केले पाहिजे. कठोर परिश्रमामुळे उत्पादकता वाढून देशाची प्रगती होईल. पाश्चात्त्य देशातील वाईट सवयीचे अनुकरण करण्याऐवजी कठोर मेहनत करण्याची सवय त्यांच्याकडून घेण्याची गरज आहे. चीनसह अन्य देशांकडे पाहिल्यास याची प्रचिती येईल. अन्य देशांनी २५ ते ३० वर्षांपूर्वीच चांगली धोरणे तयार केल्यामुळे त्या देशांची प्रगती झाली आहे. उत्पादन क्षमता वाढल्यास भारताची प्रगती होईल. त्यासाठी तरुणांनी योगदान द्यायला हवे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नोकरशाहीतील लाल फितीच्या कारभारावर त्यांनी अप्रत्यक्ष बोट ठेवले. नोकरशाहीतील विलंबामुळे देशाच्या प्रगतीला अडथळा येत आहे.

SCROLL FOR NEXT