Latest

नंदुरबार : पालकमंत्री गावित यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश

गणेश सोनवणे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी  अवकाळी पावसाने झालेल्या तळोदा तालुक्यातील सोमावल ब्रु, शिर्वे तसेच अक्कलकुवा तालुक्यातील जानीआंबा, मांडवीआंबा व सिंगपूर येथे अवकाळी पाऊस झालेल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली.

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात काल अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. गावित यांनी या भागाचा दौरा केला. यावेळी तहसिलदार गिरीष वखारे (तळोदा), तहसिलदार रामजी राठोड (अक्कलकुवा ), उप विभागीय कृर्षी अधिकारी तानाजी खर्डे, तालुका कृषि अधिकारी नरेंद्र महाले, गट विकास अधिकारी परशुराम कोकणी, निलेश गढरी, मंडळ अधिकारी समाधान पाटील, तलाठी सुनीता वळवी, कृषी सेवक रामदास पावरा ग्रामसेवक बंजारा यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावित यांनी अवकाळी पाऊस, वादळीवारा झालेल्या भागाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. याभागातील पिकांचे व पतझड झालेल्या घराच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT