Latest

पराभवानंतर नाना काटेंची प्रतिक्रिया: म्हणाले, बंडखोरीचा फटका बसला, “मतदानाच्या दोन दिवस आधी…!”

अमृता चौगुले

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेस आणि महविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे. जगताप यांनी 36 हजार 168 मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 434 मते पडली. नाना काटे यांना 99 हजार 343 मते पडली. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 82 मते पडली. यानंतर पराभूत उमेदवार नाना काटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले. परंतु बंडखोरीचा फटका नक्कीच बसला आहे. कारण राहुल कलाटेंना झालेलं मतदानही महाविकास आघाडीचेच आहे. त्यातली काही मतं ही वंचित बहुजन आघाडीची असू शकतील. मतदान होण्याच्या दोन दिवस अगोदर सत्ताधाऱ्यांनी आमचे बरेच कार्यकर्ते पोलीस बळ वापरून उचलले होते. त्यानंतर पैशांचा मोठ्या प्रमाणावर येथे वापर झाला. आमचे सर्व कार्यकर्ते संपूर्ण चिंचवड मतदारसंघात पुन्हा काम करतील आणि आम्ही जोमानं काम करू. मतदारसंघात सहानुभूती असती तर पैसे वाटलेच नसते. त्यांना पराभवाची भीती होती, म्हणूनच त्यांनी पैसे वाटले असेही नाना काटे म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT