Latest

नागपूर : नदीमध्ये खेळायला गेलेली दोन लहान मुले बुडाली

अमृता चौगुले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नदीमध्ये खेळायला गेलेल्या दोन लहान मुले खेळत असताना नदीत बुडाल्याने त्‍यांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील या घटनेने सर्वांचे मन  सुन्न झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात गणेशपूर गावात ही घटना घडली आहे. रूस्तम खान आणि रिजवान (वय 11 वर्षे) हा मामा-भाचा व इमामुल खान (वय 8 वर्षे) आईसोबत सरपण गोळा करायला कृष्णा नदीच्या परिसरात गेले होते.

नदी काठी रिजवान आणि इमामुल हे दोघेही खेळत होते. अचानक पाण्यात खेळत असताना दोघेही बुडाले. खेळण्यासाठी गेलेली मूले आईला न दिसल्‍याने शोधा शोध सुरू केली. त्‍यावेळी नदी किनाऱ्यावर त्यांचे कपडे दिसून आले. त्‍यांचा शोध घेतल्‍यानंतर त्‍यांचे मृतदेह नदीमध्ये आढळून आले.

यानंतर पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड व एमआयडीसीचे ठाणेदार अशोक कोळी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोन्ही मुलांना बाहेर काढले. याप्रकरणी एमआयडीसी बोरी पोलिसांनी मृत्यूची करण्यात आली.

हे ही वाचलं का 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT