Latest

नागपूर : सहमतीने शरीरसंबंध म्हणजे अत्याचार नव्हे, सत्र न्यायालयाचा निर्णय

backup backup

नागपुर, पुढारी वृत्तसेवा एखादी सज्ञान महिला तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवते, अशावेळी संबंधित पुरुषाला बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी धरता येणार नाही. असे स्पष्ट निर्देश नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी सागर चुन्नीलाल दडुरे हे महादुला येथील रहिवासी आहेत. सागर हे एका खासगी कार्यालयात नोकरी करतात. सागर शिक्षण घेत असताना त्यांची एका मुलीशी ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबधात झाले. त्यांनी एकमेकांच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले. सागरचा आणि संबंधित महिलेचा लग्न करण्याचा विचार होता. पण, सागरच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केला. त्यामुळं लग्न करू शकले नाही.

मुलाकडून लग्नास विरोध झाल्यानं संबंधित महिलेने अत्याचाराची तक्रार नोंदविली. सागरने माझ्यावर बलात्कार केला, माझी फसवणूक केली, अशी तक्रार पोलिसांत दिली होती. पोलीस ठाण्यातून प्रकरण न्यायालयात गेले. दोन्हीबाजूंच्या वकिलांकडून बाजू मांडण्यात आली. न्यायालयात सागरचे वकील आर. के. तिवारी यांनी सांगितले की, संबंधित महिलेने सहमतीने शरीरसंबंध ठेवले. सागरने काही जबरदस्ती केली नव्हती.

सागरचा फसवणूक करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. तिला लग्नाचे कोणतेही आमिष दिले नव्हते. हा दावा सिद्ध झाला. त्यामुळे नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सागरची निर्दोष सुटका केली. एखाद्या सज्ञान महिलेशी शरीरसंबंध म्हणजे बलात्कार नव्हे, असा निर्णय न्यायालयाने दिला. आधी सहमतीने संबंध ठेवायचे आणि नंतर बलात्काराची तक्रार करायची हे योग्य नव्हे, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपीला निर्दोष सोडण्यात आले.

हेही वाचलत का?

SCROLL FOR NEXT