Latest

नागपूर : पोलिसांशी झटापट, आमदार नितीन देशमुखांवर गुन्हा दाखल

निलेश पोतदार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वैदर्भीय आमदार नितीन देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर कलम 353 अनव्ये शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की व शाब्दिक चकमकीनंतर पोलिसांनी या संदर्भात सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदारांची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी अकोला बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे कार्यकर्त्यांसह रवी भवन परिसरात पोहोचले. प्रवेशद्वारावर त्यांना कार्यकर्त्यांसह पास नसल्यामुळे आत जाण्यास रोखण्यावरून ही शाब्दिक चकमक उडाली. पास असल्याशिवाय आत प्रवेश देण्यास पोलिसांनी मज्जाव केला. यावेळी पोलीस निरीक्षक शरद कदम आणि उपनिरीक्षक सखाराम कांबळे यांना आमदार नितीन देशमुख व कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचे बोलले जाते.

यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यावरूनच हा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपण आमदार असल्याचे धमकावत निरीक्षक, उपनिरीक्षकांशी आक्षेपार्ह वक्तव्य केल्‍याने यावरून तक्रार करण्यात आली. सदर पोलिसांनी कलम 353 अन्वये या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT