Latest

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala : सामंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्य-शोभिता धुलिपालासोबत व्हेकेशनवर? (Photo Viral)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला दोघेही एकत्र व्हेकेशन गेल्याचे फॅन्सकडून म्हटले जात आहे. दोन्ही कलाकारांनी इन्स्टाग्राम पेजवर सोलो फोटो शेअर केले आहेत. (Naga Chaitanya-Sobhita Dhulipala) काही उत्सुक फॅन्सनी तर्क लावला आहे की, दोघांच्या फोटोंमध्ये साम्य आहे. त्यामुळे फॅन्स अंदाज लावत आहेत की, दोघेही एकत्र व्हेकेशनवर गेले आहेत. याआधी दोघांचीही रिलेशनशीपची चर्चा रंगली होती. (Naga Chaitanya-Sobhita Dhulipala)

फोटोमध्ये साऊथ स्टार नागा चैतन्य एका जीपमध्ये बसून सनसेटची ऊन घेताना दिसत आहे यात त्याने व्हाईट टी-शर्ट आणि डेनिम जीन्स घातलेली दिसते. या लूकमध्ये अभिनेता स्टाईलिश दिसत आहे. नागाने पोटो शेअर करण्याच्या एक दिवस आधी शोभिताने आपला सोलो फोटो शेअर केला आहे. शोभिताने आपल्या व्हेकेशनचे अनेक फोटो शेअर केले होते. ती वाईल्डलाईफ व्हेकेशनला गेलेली दिसते. एका फोटोमध्ये शोभिता देखील नागा चैतन्यप्रमाणे जीपमध्ये बसलेली दिसतेय.

नागा-शोभिता एकत्र व्हेकेशनवर?

आता सोशल मीडियावर चर्चा आहे की, नागा-शोभिता एकत्र व्हेकेशनवर आहेत. मागच्या वर्षी शोभिताला नागाच्या नव्या घरात एकत्र पाहण्यात आले होते. पण, अद्याप दोघांनी आपल्या रिलेशनशीपवर उघडपणे काही सांगितलेले नाही.

SCROLL FOR NEXT