Latest

‘नाटू नाटू’ चा ऑस्‍करमध्ये डंका, ठरले सर्वोत्‍कृष्‍ट गाणे

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन :  भारतीय प्रेक्षकांना आज सकाळी सुखद धक्‍का मिळाला आहे. लोकप्रीय RRR चित्रपटाने आज इतिहास रचला. या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला बेस्‍ट ओरिजनल गाण्याचा ऑस्‍कर पुरस्‍कार मिळाला. यामुळे पुन्हा एकदा भारतीय चित्रपटाने जगभर आपला डंका वाजवला आहे. यावर्षी दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले हाेते. या श्रेणीत नामांकन मिळवणारा RRR हा पहिला भारतीय चित्रपट आहे.

गोल्डन ग्लोब पुरस्कारावरही उमटवली होती मोहर

एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कारावरही (Golden Globe Awards 2023) मोहर उमटवली होती. 'बाहुबली'नंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा 'आरआरआर' प्रेक्षकांसमोर आल्यानंतर या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले. या चित्रपटाने देश-विदेशात बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या काल्पनिक कथेवर हा सिनेमा बेतलेला आहे. नाटू नाटू गाणे गाणे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले. कला भैरवी आणि राहुल सिपलीगुंज यांनी लिहिले आहे.

शेवटी तो दिवस आला ज्याची सर्वजण वाट पाहत होते. 95 व्या अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर 2023 ला सुरुवात झाली आहे. लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या या अवॉर्ड शोचा हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक सिनेतारे शॅम्पेन (रेड) कार्पेटवर शोभून दिसत आहेत. या सोहळ्यामध्ये स्टार्स त्यांच्या उत्कृष्ट आणि फॅशनेबल लूकमध्ये दिसत आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT