Latest

Mysterious radio signals : आठ रहस्यमय रेडिओ सिग्नल्सचा लागला छडा

Arun Patil

वॉशिंग्टन : या ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे असे म्हणणे हे 'कूपमंडूक' वृत्तीसारखेच आहे. विहिरीतील बेडकाला विहिर म्हणजेच अख्खी दुनिया वाटत असते, त्यापलीकडे विशाल जग आहे याची त्याला कल्पनाही नसते. माणसाची अवस्था अशीच होऊ नये यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ब्रह्मांडात जीवसृष्टीचा शोध सुरू आहे. परग्रहवासीयांचे संकेत शोधण्यासाठी टेक्नोसिग्नेचर किंवा परग्रहवासीयांनी विकसित केलेल्या (Mysterious radio signals) तंत्रज्ञानाचा पुरावाही शोधला जात आहे.

संभाव्य एलियन्स सिग्नल आणि मानव-विकसित सिग्नल यांच्यामध्ये फरक करणे हे संशोधकांपुढील एक आव्हान असणार आहे. आता एका नव्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अ‍ॅल्गोरिदमच्या मदतीने आठ रहस्यमय रेडियो सिग्नल्स शोधण्यात आले आहेत. ते एलियन्सचा शोध (Mysterious radio signals) घेण्यासाठी प्रभावी ठरू शकतील असे संशोधकांना वाटते.

टोरांटो युनिव्हर्सिटीतील पीटर मा यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी अंतराळाच्या एका भागात 820 तारे पाहण्यासाठी विशिष्ट अ‍ॅल्गॉरिदमचा वापर केला. हे क्षेत्र कोणत्याही एलियन्स हालचालींनी रहीत असावे असेच यापूर्वी मानले जात होते; पण आता तिथे एक रोमांचित करणारी घटना घडली आहे. (Mysterious radio signals) डेटाच्या प्रारंभिक तपासणीत संशोधकांना हे सिग्नल्स गवसले; पण त्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले नव्हते. याचे कारण म्हणजे असे निरीक्षण करीत असताना नेहमीच अशा प्रकारचे 'अडथळे' येत असतात.

पृथ्वीवरून येणार्‍या सामान्य रेडिओ सिग्नल्सपासून (Mysterious radio signals) अंतराळातील गूढ सिग्नल्सना वेगळे करावे लागते. पीटर यांनी एक नवे मशिन 'लर्निंग अ‍ॅल्गोरिदम' विकसित केले जे आपल्या ग्रहावरील प्रत्येक प्रकारच्या बॅकग्राऊंड नॉईजपासून संभाव्य एलियन्स सिग्नल्सना चांगल्याप्रकारे वेगळे करू शकेल. त्यामध्ये 'डीप लर्निंग'चा वापर करण्यात आला आहे. अशा अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने आता आठ रहस्यमय रेडिओ सिग्नल्स शोधण्यात आले आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT