पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारूकी विषयी एक मोठे वृत्त समोर आले आहे. ( Munawar Faruqui) मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या एसएस ब्रँच (सोशल सर्विस ब्रँच) ने एका हुक्का बारवर छापा टाकला. येथे स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकीसह १४ लोकांना ताब्यात घेतलं होतं. ( Munawar Faruqui)
बिग बॉस १७ विनर मुनव्वर फारूकीविषयी एक मोठे वृत्त समोर आले. मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या एसएस ब्रँच (सोशल सर्व्हिस ब्रँच) ने एका हुक्का बारमध्ये छापा टाकला. येथे स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकीसह १४ लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. रिपोर्टनुसार, पोलिसांनी ४१ A ची नोटिस देऊन फारूकीला सोडले.
बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादव नंतर बिग बॉस १७ विजेता मुनव्वर फारूकी वादात सापडला आहे. माहितीनुसार, सोशल सर्व्हिस ब्रँचने रात्री मुंबईच्या फोर्ट परिसरात सबालन हुक्का पार्लरमध्ये छाप्यावेळी काही लोकांना ताब्यात घेतलं, यापैकी एक मुनव्वर होता.
पोलिसांना माहिती मिळाली होती की, पार्लरमध्ये तंबाकू प्रोडक्ट्ससोबत निकोटिनचा वापर हुक्का पार्लरमध्ये होत होता. सध्या या प्रकरणी पोलिस तपास करत आहे. रिपोर्टनुसार, मुनव्वर फारूकीला नोटिस देऊन रात्री उशीरा घरी जाऊ दिलं. या प्रकरणी मुनव्वर कडून अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलेले नाही.