Latest

मुंबई : महाराष्ट्राला दोन वर्षात गुजरातच्या पुढे घेवून जाणार : देवेंद्र फडणवीस

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महाराष्ट्रात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. यामूळे महाराष्ट्रामधील मोठा रोजगार गेला, ही सरकारची खेळी आहे, यावरून राजकीय वातावरण तापले आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे शुक्रवारी (दि.16) विरोधकांवर टीका केली. यावेळी ते म्‍हणाले, महाविकास आघाडी सरकाने दोन वर्षात राज्‍याला मागे टाकले आहे, आम्‍ही आता दोन वर्षांत पुढे नेवू असे फडणवीस म्‍हणाले.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, पुढील काळात सरकारकडून महाराष्ट्रात मोठी गुतंवणक करणार येणार आहे. याबाबत मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चाही झाली आहे. महाराष्ट्राला लागणारी ईको सिस्‍टीम सरकारकडून करण्यात येईल, असे फडणवीस म्‍हणाले.

तसेच, महाराष्ट्रात चांगल्‍या गोष्‍टींसोबत आम्‍ही नेहमीच आहोत. परंतु पैसे खाणा-या अधिका-यांची मात्र आता खैर नाही. असे म्‍हणत गुजरातच्या पुढे महाराष्ट्राला घेवून जाणार आहे, असे फडणवीस म्‍हणाले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT