Latest

Temperature : वाढत्या तापमानासह वायू प्रदूषणामुळे मुंबईकर कोंडीत

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुंबईकरांना सध्या वाढत्या तापमानासह वायू प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. शहर आणि उपनगरात पार्‍याने पस्तिशी गाठली आहे. दुसरीकडे, वायू प्रदूषणाने खराब पातळी गाठली आहे. सोमवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) दीडशेच्या घरात गेला. ( Temperature )

संबंधित बातम्या 

सांताक्रुझ वेधशाळेत सोमवारी किमान 24 आणि कमाल 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारी त्याचीच (25/35) पुनरावृत्ती अपेक्षित आहे. त्यातच वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. कुर्लासह (299), वांद्रे-पूर्व (255), नेरूळ (240), सिद्धार्थनगर-वरळी (224), विलेपार्ले-पश्चिम(219), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ(214), वांद्रे-कुर्ला संकुल (212), जुहू (200) येथील वायू प्रदूषण खराब कॅटेगरीमध्ये गेले आहे. ( Temperature )

SCROLL FOR NEXT