Latest

मुंबईकरांना दिवाळी GIFT – जुन्या फ्लॅटच्या बदल्यात विकत घ्या नवा फ्लॅट – CREDAIची योजना

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन – बांधकाम व्यवसायिकांची शिखर संघटना Confederation of Real Estate Developers' Associations of India (CREDAI) आणि Maharashtra Chamber of Housing Industry (MCHI) या दोन संस्थांनी एकत्र येत मुंबईकरांसाठी अभिनव योजना जाहीर केली आहे. या योजनेत मुंबईकर त्यांच्या जुन्या फ्लॅच्या बदल्यात नवा फ्लॅट घेऊ शकणार आहेत. MoneyControl या वेबसाईटने ही बातमी दिली आहे. (Mumbai homebuyers can exchange old apartments for new)

BKC येथील MMRDAच्या मैदानावर १३ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत रिअल इस्टेट प्रदर्शन भरत आहे. यामध्ये मुंबईतील १०० बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. यामध्ये या योजनेचा लाभ घेता येईल.

ZapKey या स्टार्टअपच्या माध्यमातून ही योजना राबवली जाणार आहे. ज्या व्यक्तींना मुंबईतील जुना फ्लॅट विकून नवा फ्लॅट घ्यायचा आहे, अशा ग्राहकांच्यावतीने नव्या फ्लॅटची टोकन रक्कम ZapKey भरणार आहे. त्यानंतर ९० दिवसांत जुन्या फ्लॅटची विक्री करण्याची हमी ZapKey घेईल. या बदल्यात या ग्राहकांना प्रदर्शनात सहभागी बांधकाम व्यवसायिकांकडून नवा फ्लॅट घ्यायचा आहे. जर नव्वद दिवसांत जुना फ्लॅट विकला गेला नाही, तर टोकन रक्कम बांधकाम व्यावसायिक जप्त करेल.

ZapKey ही स्टार्टअप जुन्या घरांच्या विक्रीचा व्यवसाय करते. ९० दिवसांत चांगल्या रकमेत जुने घर विकण्याची हमी ही स्टार्टअप घेत असते. २० वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली घरे ही स्टार्टअप शक्यतो घेत नाही. या व्यवहारात ZapKey ग्राहकाकडून २ टक्के तर नवीन प्रॉपर्टी विक्रीतून २ टक्के इतके कमीशन घेते.

CREDAI आणि MCHIचे अध्यक्ष बोमन इराणी म्हणाले, "या प्रदर्शनात बांधकाम व्यावसायिक, वित्त संस्था, घर घेऊ इच्छिणारे असे एकत्र येतील. त्यामुळे गृहखरेदीची प्रक्रिया सोपी होईल."

हेही वाचा

SCROLL FOR NEXT