Latest

मुंबई : विवाहितेवर सामूहिक बलात्कार; चौघांना अटक

backup backup

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एका 19 वर्षांच्या विवाहितेवर नातेवाईकासह चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कुर्ल्यामध्ये घडली. पीडित महिला ही कोलकत्ता येथून मुंबईमध्ये नोकरीसाठी आलेली होती. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या चौघांना बुधवारी स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कोलकत्ता येथील रहिवाशी असून मार्च महिन्यात तिच्या एका नातेवाईकाने तिला मुंबईमध्ये नोकरीसाठी आणले होते. मुंबईत आल्यानंतर ती तिच्या गोवंडी, शिवाजीनगर परिसरातील नातेवाईकांच्या घरी राहत होती. मार्च महिन्यात संबंधीत नातेवाईक तिला घेऊन कुर्ला येथे आला होता. तिथेच त्याच्या परिचित तीन आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून आरोपींनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

नराधमांच्या तावडीतून अखेर या महिलेने स्वत:ची सुटका करुन घेत शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. तेथील पोलिसांना तिने घडलेला प्रकार सांगितला. मात्र तिच्यावर सामूहिक बलात्कार हा कुर्ला परिसरात झाल्याने पोलिसांनी तिला नेहरुनगर पोलीस ठाण्यात नेले. नेहरूनगर पोलिसांनी तिची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करून चारही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT