मुंबई : पुढारी वार्ताहर ट्रॉम्बे चित्ताकॅम्प येथील के. जी. कलेक्शन येथे अंमली पदार्थ विरोधी कक्षच्या आझाद मैदान शाखेने छापा टाकून ५ लाख रुपये किंमतीच्या ई सिगारेट जप्त केल्या. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.
चित्ताकॅम्प येथील के. जी. कलेक्शन मध्ये ई सिगारेटची विक्री बरोबरच वापरलेल्या ई सिगारेट पुन्हा विक्री करण्यासाठी लिक्वीड फ्लेवर्स वापरून पुन्हा रिफील केल्या जातात. तसेच त्यांच्या बॅटरीज पुन्हा रिअसेंबल केल्या जातात अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या आझाद मैदान शाखेला मिळाली. त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करून एका इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ लाख किंमतीचे ३०१ ई सिगारेट, ४०२ वापरलेले रिकामे ई सिगारेट, १३० ई सिगारेट बॅटरीज व फिल्टर्स, ३०३ ई सिगारेट फ्लेवर्स बॉटल्स, ९ ई सिगारेट बॅटरी चार्जर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत आझाद मैदान युनिटतर्फे जप्त मुद्देमाल व आरोपींवर ट्रॉम्बे पोलीस ठाणे येथे इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा २०१९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा :