Latest

‘मुळा’मध्ये यंदा उच्चांकी गाळप, कारखान्याच्या 44 व्या हंगामाची विधिवत सांगता

अमृता चौगुले

सोनई : पुढारी वृत्तसेवा

मुळा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 या 44 व्या गळीत हंगामाची सांगता आज (बुधवार) सकाळी 9 वाजता कारखान्याचे संस्थापक, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत शेवटची मोळी टाकून होणार आहे.

कारखान्याचे अध्यक्ष तुवर यांनी प्रसिद्धीस पत्रकात म्हटले आहे की, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने प्रथमच उच्चांकी गळीत करून संपूर्ण उसाचे गाळप करून नवा विक्रम केला आहे.

कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गळीत होण्यासाठी निसर्गाची लाभलेली साथ, कारखाना कामगारांबरोबरच ऊसतोडणी कामगार व यंत्रणेचे शेवटपर्यंत मिळालेले सहकार्य व ऊस उत्पादकांना ऊस कुठल्याही परिस्थितीत शिल्लक राहणार नाही, याबाबत नेतृत्वासंबंधी असलेला आजवरचा अनुभव व विश्वास यामुळेच हे शक्य झाले. यानिमित्त कारखान्याचे संचालक नीलेश विठ्ठलराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी अनिता पाटील, तसेच रंगनाथ लक्ष्मण जंगले व त्यांच्या सुविद्य पत्नी संचालक अलका जंगले या उभयतांच्या हस्ते व ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात गव्हाणीची विधिवत पूजाविधी होणार आहे. यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर व संचालक मंडळाने केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.