Latest

MS Dhoni Captaincy : धोनीने CSK चे नेतृत्व सोपवले रविंद्र जडेजाकडे!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2022 सुरु होण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत पण त्याआधी महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) कर्णधारपद सोडले असून त्याने ही जबाबदारी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडे सोपवली आहे. यापुढे धोनी आयपीएलच्या १५व्या हंगामात तो एक खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. (MS Dhoni Captaincy)

गतविजेत्या चेन्नईला वानखेडे स्टेडियमवर २६ मार्च रोजी कोलकाता विरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे पण त्याआधी चार वेळा चॅम्पियन असलेल्या CSK मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. (MS Dhoni Captaincy)

गतविजेत्या चेन्नईला वानखेडे स्टेडियमवर २६ मार्च रोजी कोलकाता विरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे पण त्याआधीच चार वेळा चॅम्पियन असलेल्या CSK मध्ये मोठा बदल झाला आहे. CSK ने अधिकृत निवेदन जारी करून धोनीने कर्णधारपद सोडल्याची माहिती दिली आहे. निवेदनानुसार, 'महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आहे आणि संघाचे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. जडेजा २०१२ पासून संघाचा भाग आहे. तो CSK चा कर्णधार असेल. धोनी या मोसमात आणि पुढेही चेन्नईचा भाग राहील.'

सीएसकेने यावेळी आयपीएल लिलावापूर्वी धोनी-जडेजासह चार खेळाडूंना कायम ठेवले होते. जाडेजाला फ्रँचायझीने सर्वाधिक १६ कोटी रुपये देऊन कायम ठेवले. मात्र आयपीएल २०२२ साठी धोनीला केवळ १२ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले. तेव्हापासून जडेजाला कर्णधार बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती. (MS Dhoni Captaincy)

धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली CSK ने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये चार वेळा विजेतेपद पटकावले. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने १२१ सामने जिंकले आहेत. CSK व्यतिरिक्त धोनीने रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचेही नेतृत्व केले.

आयपीएलच्या करियरमध्ये आतापर्यंत १०० किंवा त्याहून अधिक सामने जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. त्याने कर्णधार म्हणून २०१४ पैकी १२१ सामने जिंकले आहेत. याशिवाय त्याला ८२ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. (MS Dhoni Captaincy)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT