Latest

पुण्यात एमपीएससी परीक्षार्थी पुन्हा रस्त्यावर; या मागणीसाठी आक्रमक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या पदांसाठी कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. मात्र, परीक्षा तोंडावर आलेली असताना एमपीएससीने कौशल्य चाचणीसाठी दिलेल्या हिंदी रेमिंग्टन की-बोर्डवर आक्षेप घेण्यात आला असून, राज्य परीक्षा परिषदेच्या धर्तीवर कौशल्य चाचणी घेण्याची मागणी करीत एमपीएससी परीक्षार्थींनी सोमवारी पुन्हा रस्त्यावर येत आंदोलन केले. दरम्यान, उमेदवारांनी आक्षेप नोंदविल्यानंतर एमपीएससीने कौशल्य चाचणी मराठी रेमिंग्टन की-बोर्डवर होणार असल्याचे स्पष्ट केले.

एमपीएससीने लिपिक टंकलेखक आणि कर सहायक मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी अनिवार्य केली आहे. त्यानुसार 7 एप्रिलला कौशल्य चाचणी होणार आहे. मात्र, परीक्षा तोंडावर आलेली असताना एमपीएससीकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सराव चाचणीसाठी मराठी रेमिंग्टन की-बोर्डऐवजी हिंदी रेमिंग्टन हा की-बोर्ड देण्यात आला. तसेच शब्दमर्यादा मराठीसाठी तीनशे आणि इंग्रजीसाठी चारशे शब्द देण्यात आली आहे.

एमपीएससीची ही नियमावली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणार्‍या टंकलेखन परीक्षेसाठी असणार्‍या नियमांविरुद्ध असल्याचे उमेदवारांनी सांगितले. तसेच कौशल्य चाचणी राज्य परीक्षा परिषदेच्या धर्तीवर घेण्यात यावी. तसेच, की-बोर्ड मराठी रेमिंग्टन उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. स्पर्धा परीक्षार्थींच्या आंदोलनानंतर एमपीएससीने परीक्षेबाबतची माहिती प्रसिद्धि पत्रकाद्वारे स्पष्ट केली. की-बोर्डबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे निदर्शनास आले.

मात्र, सराव चाचणीसाठी उपलब्ध करून दिलेला की-बोर्ड उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप कळण्यासाठीच आहे. उमेदवारांनी संगणकीय प्रणालीवर आधारित मराठी टंकलेखन चाचणीचा सराव आयएसएम व्ही 6 या प्रणालीवरील मराठी रेमिंग्टन की-बोर्डवरच करावा. प्रत्यक्ष चाचणी आयएसएम व्ही 6 प्रणालीवरील मराठी रेमिंग्टन की-बोर्डवर होणार असून, शब्दमर्यादा स्पष्ट केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT