Latest

MP Election Result 2023 Live Update | मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: मध्य प्रदेशातील २३० जागांसाठी आज रविवारी (दि.२) मतमोजणी होत आहे. राज्यात १७ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. राज्यात ७७.८२ टक्के विक्रमी मतदान झाले होते, जे २०१८ च्या निवडणुकीपेक्षा २.१९ टक्के अधिक आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपमध्ये विजयासाठी जोरदार रस्सीखेच होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. (MP Election Result 2023 Live Update)

मध्य प्रदेशातील सर्व २३० विधानसभा जागांसाठी सकाळी ८ वाजता कडेकोट बंदोबस्तात ५२ जिल्हा मुख्यालयात मतमोजणी सुरू झाली.  मध्य प्रदेशात कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी ११६ चा जादुई आकडा आवश्यक असेल. येथे चारवेळा शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री राहिले आहेत. आता पाचव्यांदा ते सत्ता राखणार का? याकडे लक्ष लागले आहे. तर काँग्रेस नेते कमलनाथ यांनी, मध्य प्रदेशच्या जनतेवर पूर्ण विश्वास असून एक्झिट पोल काय सांगतोय याच्याशी मला देणेघेणे नाही, असे म्हटले आहे. (MP Election Result 2023 Live)

MP Live Result Update :

मध्य प्रदेशात भाजपला सत्ता मिळणार- ज्योतिरादित्य शिंदे

भाजप राज्यात पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशात झालेल्या विकासामुळे जनता भाजपला आशीर्वाद देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि आम्ही पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू."

मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर, काँग्रेस १०६ तर भाजप १०५ जागांवर आघाडीवर
मध्यप्रदेशातील इंदौरमधून भाजपचे कैलास विजयवर्गीय आघाडीवर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT