Latest

सर्वात महागडा; पण आरोग्यदायी सुका मेवा

Arun Patil

नवी दिल्ली : जर तुम्ही विचार करत असाल की, जगातील सर्वात महाग ड्रायफ्रूट म्हणजे काजू, बदाम किंवा पिस्ता, तर तुम्ही चुकीचे आहात. वास्तविक, जगातील सर्वात महाग ड्रायफ्रूट पाईन नटस् आहे. त्याला 'चिलगोजाला पाईन नटस्' देखील म्हणतात. हे खूप महाग ड्रायफ्रूट आहे. मात्र, याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच बाजारात त्याची मागणी जास्त आहे.

पाईन नटस्बद्दल असे म्हटले जाते की, ते खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. यामुळे रक्ताची कमतरताही दूर होते. अनिमियाच्या रुग्णांना ते खाण्याचा सल्ला दिला जातो. पाईन नटस्मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरतादेखील पूर्ण करण्याची क्षमता असते. शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते. पाईन नटस्बद्दल असे म्हटले जाते की, ते मेंदूच्या आरोग्यासाठीदेखील चांगले आहे. यामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड आढळते जे हृदय व मेंदूसाठी गुणकारी आहे. हे ड्राय फ्रूट वजन नियंत्रणासाठीही फायदेशीर आहे. या नटस्मध्ये प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते जे भूक नियंत्रित करण्यास मदत करते. पाईन नटस्बद्दल असे म्हटले जाते की, ते मधुमेहदेखील नियंत्रित करते. यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स नाही आणि रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत करू शकते.

SCROLL FOR NEXT