लंडन : अनेक लोकांना कुटुंबासह निसर्गरम्य बेटांवर सहलीसाठी जाणे आवडत असते. काही बेटं तर अशी असतात, की तिथून आपला पाय निघत नाही. परंतु जगभरात काही धोकादायक बेंटही आहेत. अशा अत्यंत धोकादायक बेटांची ही माहिती…
सबा आयलँड : हे नेदरलँडमध्ये आहे. या छोट्याच्या द्वीपाचे क्षेत्रफळ केवळ 13 चौरस किलोमीटर आहे. सबा आयलँड हे खूपच सुंदर आहे. वसुंधरेने या आयलँडला भरभरून दिले आहे. परंतु सबा आयलँड हे तितकेच धोकादायकही आहे. येथील समुद्र कायम उधाणलेला असतो. अनेक जहाजांना येथे जलसमाधी मिळते. सद्यस्थितीत सबा आयलँडवर केवळ 2000 नागरिक वास्तव्य करतात. राम्री द्वीप ः राम्री द्वीप हे मगरींचे बेट म्हणून ओळखले जाते. म्यानमारमध्ये राम्री द्वीप आहे. येथे अनेक महाकाय मगरी दिसतात. विशेष म्हणजे या आयलँडच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद आहे. येथे येणार्या बहुतांश पर्यटकांना मगरींनीच गिळंकृत केले आहे. 1000 जपानी जवान या आयलँडवर आले होती.
त्यांच्यावर मगरींनी हल्ला चढवला होता. त्यापैकी केवळ 20 जवान जिवंत परतले होते, असे सांगितले जाते. परंतु, या वृत्ताला अद्याप कोणाकडूनही दुजोरा मिळू शकलेला नाही. लुजोन द्वीप ः फिलिपाईन्स येथील लुजोन द्वीप हे वोल्कॅनो आयलँड म्हणून प्रसिद्ध आहे. येथे धोकादायक ज्वालामुखी आहेत. ज्वालामुखीच्या क्रेटरमध्ये एक तळे आहे. त्याता ताल तळे असे म्हटले जाते. या आयलँडला जगभरातील पर्यटक भेट देतात. परंतु हे धोकादायक बेट म्हणून ओळखले जाते. येथे केव्हाही ज्वालामुखीचा स्फोट होऊ शकतो.