Latest

Moscow Concert Hall Attack : मॉस्कोत दहशतवादी हल्ला; ६० ठार, १४५ जखमी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मॉस्कोमधील क्रॉकस सिटी हॉलमध्ये संगीत कार्यक्रम सुरू असताना लष्करी जवानांसारखे कपडे घालून आत शिरलेल्या तीनजणांनी अंदाधुंद गोळीबार व बॉम्बफेक केली. त्यात किमान ६० जण ठार झाले, तर १४५ लोक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी स्फोटके फेकल्याने हॉलला मोठी आग लागली होती.

रशियन सरकारने हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, तीन बंदूकधारी हॉलमध्ये घुसले. तीन हजारांहून अधिक प्रेक्षक कार्यक्रमाचा आनंद घेत असताना त्या तिघांनी अचानक अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. तसेच भेदरलेल्या प्रेक्षकांवर बॉम्बही फेकले. त्यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला. आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक जखमी झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT