Latest

गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी 25 खेळाडू डोपिंगमध्ये दोषी

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गोव्यात गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी उत्तेजक द्रव्यांचा वारेमाप वापर केला असून स्पर्धेतील सहभागी जवळपास 25 खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणीमध्ये दोषी आढळले आहेत. यातील अनेक खेळाडू पदक विजेते असून त्यांचे पदक रद्द होण्याबरोबरच त्यांची कारकीर्दसुध्दा संपण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

याचवर्षी 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या काळात गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत सहभागी 25 हून अधिक खेळाडू आतापर्यंत डोपिंगमध्ये अडकले आहेत. राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्था (नाडा) ने या गोष्टीचा खुलासा केला असून दोषी खेळाडूंवर तत्काळ प्रभावाने बंदी घालण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. दोषी आढळलेल्या 25 खेळाडूंपैकी 9 जण ट्रॅक अँड फिल्डमधील असून 7 वेटलिफ्टर आहेत.

नाडाच्या या अहवालाने भारतीय ऑलिम्पिक महासंघावर कारवाईचा दबाव वाढत आहे. सध्या 25 जण असले तरी अजून नाडाच्या प्रयोगशाळेत अजून काही खेळाडूंचे सॅम्पल तपासण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दोषी खेळाडूंची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT