पुढारी ऑनलाईन डेस्क : तब्बल ६२ वर्षानंतर मान्सून आज (दि. २५) दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळी दाखल झाला. दोन्ही शहरे एकमेकांपासून १,४३० किलोमीटर अंतरावर आहेत. यापूर्वी २१ जून १९६१ मध्ये मुंबई आणि दिल्लीत एकाच दिवशी मान्सूनने हजेरी लावली होती, अशी माहिती हवामान विभागाच्या कार्यालयाने दिली. ( Monsoon arrives in Mumbai, Delhi )
नैऋत्य मान्सून दिल्ली आणि मुंबईत दाखल झाला आहे. दोन्ही शहरांमध्ये मुसळधार पाऊस झाला. यापूर्वी अशी दुर्मिळ घटना २१ जून १९६१ रोजी घडली होती, जेव्हा मान्सून दिल्ली आणि मुंबईवर एकाच वेळी पुढे सरकला होता, असे हवामान विभागाच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
मान्सून दिल्लीत साधारणपणे २७ जूनर्पंयत दाखल होतो. यावर्षी तो नियोजित वेळेपेक्षा दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. मुंबईत मान्सून ११ जून रोजी दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र तब्बल दोन आठवडे उशीरा मान्सून मुंबईत दाखल झाला त्याचवेळी राजधानी दिल्लीतही तो दाखल झाल्याने एक दुर्मिळ योगायोग ६२ वर्षानंतर पुन्हा घडल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.