नाशिक; राममंदिराचे निर्माण होणे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. आज मोदींमुळे बाळासाहेबांसह सर्व भारतीयांचे स्वप्न साकार होते आहे. मोदी है तो मूनकीन है असे गौद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.12) राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होते आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राममंदिराचे निर्माण होणे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. आज मोदींमुळे बाळासाहेबांसह सर्व भारतीयांचे स्वप्न साकार होते आहे. मोदी है तो मूनकीन है अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. इतकच काय तर, मोदी लक्षद्विपला गेले आणि मालदीवला भूकंप आला. मोदींंमुळे भारताकडे वाईट नजरेने बघण्याची कोणत्याही शत्रुची हिंमत आज नाही. मोदींमुळे जगभरात देशाला वेगळा सन्मान मिळाला. मोदी हे कट्टर राष्ट्रभक्त व दुरदुष्टी असलेले नेते असल्याचे गौद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
मोदी हे केवळ देशाचे भवितव्य बघतात. जगभरात मोदींच्या नावाचा गौरव होतो आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वात आज आपला देश महासत्ताक होण्याच्या मार्गावर आहे. मोदींच्या रुपाने आपल्याला दूरदुष्टी असलेला पंतप्रधान मिळाला. मोदींकडून प्रेरणा व उर्जा घेऊन आम्ही मार्गक्रमण करत असून 60 वर्षात जे होऊ शकले नाही ते मोदींनी करुन दाखवले. या नऊ वर्षात मोदींनी एक दिवस देखील सुट्टी घेतली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मोदी हे आमचा गौरव आहे, आमचे सौभाग्य आहे, देशासाठी पूर्ण जीवन त्यांनी समर्पित केले आहे.
मराष्ट्राच्या कुंभनगरीत युवकांचा महाकुंभ याठिकाणी भरला आहे. नाशिककरांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. नाशिकला युवा महोत्सव भरवून संधी दिल्याने मोदींचे आभार आहेत. ज्या नाशिकमध्ये भगवान राम-लक्ष्मण, सीता यांचे वास्तव्य राहिले. अशा रामजन्म भूमीत पंतप्रधान आल्याने ही नाशिकसाठी गौरवाची बाब आहे. अयोद्धेत प्रभु राम मंदिराच्या उद्घाटनाचे हे शुभसंकेत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.