Latest

Sushma Andhare News : ससून ड्रग्ज प्रकरणात डॉ. संजीव ठाकूर यांची नार्को टेस्ट करा; सुषमा अंधारे यांचा आरोप

अमृता चौगुले

पुणे : ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणात ससूनरुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर, रोझरी स्कूलचे संस्थापक विनय अरहना, त्यांचा चालक दत्ता डोके आणि ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील यांना सहआरोपी करून त्यांची नार्को चाचणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. त्या पुण्यात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर, पुणे शहर अध्यक्ष गजानन थरकुडे उपस्थित होते.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या, , नार्को टेस्ट नंतरच या प्रकरणात अनेक मंत्र्यांची नावे समोर येतील. संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करा अन्यथा या सगळ्या प्रकरणी महविकास आघाडी 24 तारखेला रस्त्यावर उतरून मोर्चा काढणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. त्यांना वेळ नसेल, तर पुण्याची काळजी करणारे पालकमंत्री अजित पवार यांनी तरी या प्रकरणात बोलावे.अजित पवार यांच्यावर आमचा विश्वास आहे, यांनी यात लक्ष घालावं ही आमची अपेक्षा आहे. या प्रकरणाची अजित पवारांनी चौकशी करावी, अशी मागणी सुषमा अंधारेंनी पवारांकडे केली.

राज्यातील काही मंत्री आणि आमदारांचा तसेच पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे. त्या पुण्यात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दादा भुसेना आम्ही गुन्हेगार मानत नाही, मात्र ते पालकमंत्री असताना असे प्रकार घडतात कसे, त्यांना याबाबत माहिती नव्हती का, जर माहीत नसेल तर दादा भुसे पालकमंत्री म्हणून सपशेल फेल ठरले आहेत. असे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT