Latest

खेडमध्ये आमदार गोपीचंद पाडळकर यांचे हेलिकॉप्टर सापडले वादळात

backup backup

खेड; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे हेलिकॉप्टर मंगळवारी (दि.१७) सायंकाळी खेडमध्ये वादळात सापडले. मुसळधार पाऊस सुरू असल्याने त्यांचे हेलिकॉप्टर नियोजित वेळेत न उतरता तब्बल अर्धा तास उशिराने उतरले.

भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांची खेड मधील भरणे येथे मंगळवारी (दि.१७) धनगर जागृती सभा होती. त्यासाठी आ. पडळकर हेलिकॉप्टरने खेडमध्ये येणार होते. मात्र नेमके हेलिकॉप्टर उतरण्याच्या वेळेत सोसाट्याच्या वारा व मुसळधार पाऊस सुरू झाला. यावेळी भरणे येथील हेलिपॅडवर पाडळकर यांचे हेलिकॉप्टर उतरण्यास तब्बल अर्धातास विलंब झाला. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते. सायंकाळी ४.१४ वाजता आ.पाडळकर यांच्यासह स्विय सचिव, अंगरक्षक यांना घेऊन धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना घेऊन उतरले व सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

यावेळी आ.पडळकर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना म्हणाले, कोकणातील धनगर समाज गेले सत्तर वर्ष संघर्ष करत असून पावसामुळे जरी आमचे हेलिकप्टर उतरण्यास विलंब झाला असला तरी आमच्या पाठीमागे लोकांचे आशिर्वाद आहेत. त्यामुळे आमचे हेलिकॉप्टर सुरक्षित उतरले. कोकणातील धनगर समजावर गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित, वंचित आहे. त्यामुळे कोकणातील बांधवांना भेटून त्यांना देखील राज्यातील समस्त धनगर समाजासोबत पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळत नाही तो पर्यंत संघर्ष करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT