Latest

MLA Disqualification Case : कागदपत्रे सादर करण्यास शिंदे गटाने मागितली वेळ

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर मंगळवारपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे. (MLA Disqualification Case ) ठाकरे गटाकडून आज सुनावणीत कागदपत्र सादर होतील. तर शिंदे गटाला कागदपत्रे सादर करायला वेळ वाढवून देण्यात आला. (MLA Disqualification Case )

शिंदे गटाने २४ नोव्हेंबरपर्यंत वेळ मागितलीय. त्यामुळे शिंदे गट २४ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करेल. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी उपस्थित आहेत. ही सुनावणी विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांच्यासमोर होईल.

मागील सुनावणीत ठाकरे गटाचा 'व्हिप' मिळाला नसल्याचा दावा शिंदे गटाने केला होता; तर अधिक पुरावे सादर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी ठाकरे गटाने आक्रमक युक्तिवाद केला होता.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर 2 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत 'व्हिप'बाबत दोन्ही गटांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता. त्या युक्तिवादावरील आपला निर्णय राखून ठेवतानाच दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्याची मुदत 16 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली होती. आता 21 नोव्हेंबारपासून नियमित सुनावणी होईल. 6 नोव्हेंबरपर्यंत सर्व कागदपत्रे, 16 नोव्हेंबरपर्यंत सर्व पुरावे सादर करावेत. 31 डिसेंबरपर्यंत मला निर्णय द्यायचा आहे, त्यासाठी दोन्ही गटांकडून मला सहकार्य लागेल. अधिवेशन काळातही सुनावणी होईल, असे विधानसभा अध्यक्षांनी मागील सुनावणीत स्पष्ट केले होते. त्यानुसार आजपासून नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे.

SCROLL FOR NEXT