Latest

मंत्रालय आजपासून पाच दिवस बंद

मोहन कारंडे

मुंबई : राज्य सरकारने अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) बरोबर शुक्रवारी ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) ची सरकारी सुट्टी जाहीर केल्याने मंत्रालय आता २ ऑक्टोबरपर्यंत सलग पाच दिवस बंद राहणार आहे.

अनंत चतुर्दशीची स्थानिक सुट्टी असल्याने मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सरकारी कार्यालये बंद असणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आणि ईद-ए-मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे २८ तारखेला आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागांत गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद-ए-मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणार्‍या मिरवणुकांमुळे पोलिस यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने २९ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर ३० सप्टेंबरला शनिवार, १ ऑक्टोबर रविवार आणि सोमवारी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे.

SCROLL FOR NEXT