Latest

हिंदूत्वाला ‘मिंदे’ गटाने कलंक लावला : सुषमा अंधारेंची शिंदे गटावर बाेचरी टीका

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदूत्वाला 'मिंदे' गटाने कलंक लावला. तुम्ही जर शिवसेनेचे वारसदार असता तर शिवसैनिकांची काळजी घेतली असती. तुमचे हिंदूत्व ईडीचे कार्यालयावर आधारित हिंदूत्व आहे. अशी बाेचरी टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. त्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात त्‍या बोलत होत्या.

नारायण राणे यांनी एकेकाळी सोनिया गांधी यांच्यासमोर लोटांगण घालत होते. आज हेच नारायण राणे उद्धव ठाकरेंवर हिंदूत्व सोडल्याची टीका करत आहेत, असेही अंधारे म्‍हणाल्‍या.  तुम्ही जर शिवसेनेचे वारसदार असले असते तर शिवसैनिकांची काळजी घेतली असती. तुमचे हिंदूत्व ईडीचे कार्यालयावर आधारित हिंदूत्व आहे. दीपक केसरकर तुम्ही मुंबई ते गोवा टुअरचा हिशोब देणार होता. अजूनही तुम्ही त्याबद्दल चकार शब्द काढलेला नाही. तुम्ही बीकेसीच्या मैदानावर केलेले खर्च १० कोटी कोठून आणले, असा सवालही सुषमा अंधारे यांनी यावेळी केला.

हेही वाचलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT