Latest

मिलिंद सोमण : ‘अंकिताचं वय ३०, मी तिच्यापेक्षाही तरुण’

मोहसीन मुल्ला

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मिलिंद सोमण फिटनेसच्या बाबतीत फारच सजग आहे. त्याचा देखणेपणा, रुबाब ५६व्या वर्षीही कायम आहे. मिलिंद सोमण आजही एखाद्या ग्रीक देवतेसारखा मोहनी घालत असतो. मिलिंद सोमण याची बायको अंकिताचे वय ३० वर्षं आहे. म्हणजे दोघांच्या वयात २६ वर्षांचं अंतर आहे.

सर्वसाधारण नवरा बायकोत वयाचा फरक किती असावा यावर काही पारंपरिक आणि ठोकळेबाज विचार ठरलेले आहेत. पण मिलिंद आणि अंकिताने ही पारंपरिक चौकट मोडून काढलेली आहे. 

मिलिंदने नुकतीच एका इंग्रजी मासिकाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने दोघांतील प्रेम, पती-पत्नीचं नात, वयातील अंतर यावर सविस्तर आणि मनमोकळेपणाने मतं व्यक्त केलेली आहेत. 

"आमच्या इच्चा आकांक्षा यात फार काही फरक आहे असे मला वाटत नाही. तिचे वय ३० आहे. मला तिच्यापेक्षा थोडे तरुण असल्यासारखे वाटते," असे मिलिंदने म्हटलेले आहे. 

पतीपत्नीतील खासगी जीवनाबद्दल बोलायचे झाले तर तंदरुस्त शरीर आणि तंदरुस्त मन आवश्यक असते, ते जर नीट असेल तर लैंगिक जीवनावर काही परिणाम होण्याचा प्रश्न येत नाही, असे तो म्हणाला आहे.

नियमित व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे असे तो म्हणाला, "असं म्हटलं जातं की मन हे स्नायूंत असते. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपण प्रत्येक स्नायूकडे लक्ष देतो. त्यामुळे आपले शरीर कार्यक्षम राहते. सहाजिकच त्याचा परिणाम आपल्या लैंगिक जीवनावरही  होतो."

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT