Latest

Midnight operation : ‘पीएफआय’वर छापे, केंद्रीय तपास संस्‍थांनी ‘ऑपरेशन मीडनाईट’ कसे राबवले ?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्‍ट्रीय तपास संस्‍था (एनआयए) आणि सक्‍तवसुली संचालनालयाने गुरुवारी मध्‍यरात्रीपासून पॉप्‍युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्‍या अनेक ठिकाणांवर छापे टाकले.  अत्‍यंत गाेपनीय पद्‍धतीने केंद्रीय संस्‍थांनी 'ऑपरेशन मीडनाईट' ( Midnight operation ) राबवले. 'एनआयएन' आणि 'ईडी'ने ११ राज्‍यांमध्‍ये ही धडक कारवाई केली. या कारवाईत  'पीएफआय'च्‍या प्रमुख नेत्‍यांसह १०६ जणांना अटक करण्‍यात आली आहे.

गोंधळ टाळण्‍यासाठी मध्‍यरात्री कारवाई

एनआयए आणि केंद्रीय संस्‍थेच्‍या उच्‍च अधिकार्‍यांची एक बैठक झाली. यानंतर अत्‍यंत गौपनीय पद्‍धतीने ही कारवाई
करण्‍यात आल्‍याचे इंडिया टूडेच्‍या वृत्तात म्‍हटलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्‍या देखरेखेखाली हे 'ऑपरेशन मीडनाईट' राबविण्‍यात आले. या कारवाईसाठी सहा नियंत्रण कक्ष स्‍थापन करण्‍यात आले होते. मध्‍यरात्रीच 'एनआयए' आणि 'ईडी'ची पथके कारवाईच्‍या ठिकाणी पाठविण्‍यात आली. एकाच वेळी ११ राज्‍यांमध्‍ये समन्‍वय साधून ही धडक कारवाई करण्‍यात आली. संशयित आरोपींना ताब्‍यात घेताना गोंधळ होवू नये, तसेच समाजकटंकांनी या कारवाईचा गैरफायदा घेवू नये यासाठी मध्‍यरात्री ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

Midnight operation : २०० कर्मचार्‍यांचा सहभाग, १०६ जणांना अटक

दहशतवादाला आर्थिक रसद पुरविणे, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे आणि दहशतवादी संघटनांमध्‍ये सहभागी
होण्‍यासाठी नागरिकांना प्रवृत्त केल्‍याप्रकरणी ही कारवाई करण्‍यात आली. या कारवाईसाठी एनआयएचे चार आयजी व एडीजी, १६ एसीपंसह सुमारे २०० कर्मचार्‍यांनी या कारवाईत भाग घेतला. यामध्‍ये 'पीएफआय'च्‍या प्रमुख नेत्‍यांसह १०६ जणांना अटक करण्‍यात आली आहे.

१५० मोबाईल फोन, ५० हून अधिक लॅपटॉप, वादग्रस्‍त कागदपत्रे जप्‍त

संबंधित टीमकडे सर्व माहिती कारवाई आधी देण्‍यात आली. आतापर्यंत १५० मोबाईल फोन, ५० हून अधिक लॅपटॉप, वादग्रस्‍त कागदपत्रे, नावनोंदणी फॉर्म जप्‍त करण्‍यात आले आहेत. आजच्‍या कारवाईपूर्वी १९ सप्‍टेंबरपूर्वी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्‍ये 'एनआयए'ने छापा टाकून चौघांना अटक केली होती. 'पीएफआय'ला आखाती देशातून आर्थिक मदत मिळत असल्‍याचे तसेच ही संघटना विशिष्‍ट धर्माच्‍या लोकांची प्रशिक्षण देत असल्‍याचे या चौकशीत स्‍पष्‍ट झाले होते.

आखाती देशातून 'पीएफआय'ला आर्थिक रसद

'पीएफआय'ला आखाती देशांमध्‍ये गुप्‍तपणे  निधी गोळा करत असून, ही रक्‍कम दहशतवादी कारवायांसाठी वापरली जात हाेती. हा आर्थिक निधी पीएफआय, अन्‍य व्‍यक्‍तींच्‍या आणि संस्‍थांच्‍या बँक खात्‍यांमध्‍ये हस्‍तांतरीत करण्‍यात आल्‍याचे तपासात स्‍पष्‍ट झाल्‍याची माहिती केंद्रीय तपास संस्‍थांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला दिली होती. यानंतर धडक कारवाईसाठी 'ऑपरेशन मीडनाईट' राबविण्‍यात आले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT