Latest

Maharashtr Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी लांबणीवर

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtr Political Crisis) मंगळवारी (दि.२९) होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गेल्या काही दिवसांपासून सर्वेाच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुख्यमंत्र्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सत्तासंघर्षावरील ही सुनावणी आज होती. या केसप्रकरणातील पाच न्यायमूर्तींपैकी न्यायमूर्ती कृष्णमुरारी हे उपलब्ध नसल्याचे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

१ नोव्हेंबरला घटनापीठासमक्ष झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाला लिखित स्वरूपात बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले होते. दोन्ही गटांनी कुठले मुद्दे मांडण्यात येतील आणि कुठले वकील कुठल्या मुद्द्यावर युक्तिवाद करतील, याची लिखित माहिती द्यावी, असे आदेश देऊन घटनापीठाने २९ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. मात्र सोमवारी रात्री मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सुनावणी होणार नसल्याचे न्यायालायने स्पष्ट केले आहे.

या सत्तासंघर्षावर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील दोन्ही गटाच्या विविध याचिकांवर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठापुढे सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी पुढची सुनावणी कधी होणार हे मत्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. (Maharashtr Political Crisis)

SCROLL FOR NEXT