Latest

MG Motor India : एमजी मोटर इंडिया 2023 मध्ये भारतात ईलेक्ट्रिक कार लाँच करणार, वाचा वैशिष्ट्ये

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : MG Motor India : पुढील वर्षी 2023 मध्ये ईलेक्ट्रॉनिक व्हेईकल कार भारतीय बाजारात लाँच करणार आहेत. विशेष म्हणजे कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी ही कार असणार आहे. ही कार एअर ईव्ही वर आधारित असेल. भारताबाहेर ही कार एमजी मोटरच्या अन्य ब्रांड नेम वूलिंगद्वारे यापूर्वीच विकले जात आहेत. E230 हा तिचा कोड आहे आणि ती इंडोनेशियामध्ये विकली जाते. मात्र, भारतीय वातावरणआणि रस्ते याचा अभ्यास करून यामध्ये बदल करण्यात येणार आहे. त्याचे परीक्षण सुरू करण्यात आले आहे.

MG Motor India : भारतात लाँच करताना एअर ईव्हीचे नाव बदलू शकते. ही कार जागतिक स्मॉल इलेक्ट्रिक व्हेईकल्स प्लॅटफॉर्म वर आधारित आहे. तिच्या बॉडी स्टायलिंगमध्ये बदल होऊ शकतात.

भारतीय वातावरणानुसार बदल करताना यामध्ये बॅटरी मॅनेमेंटमध्ये बदल होऊ शकतात. उदाहरणार्थ भारतातील गरम वातावरणात टिकण्यासाठी यामध्ये एक उत्तम क्लाइमेट कंट्रोल युनिट दिले जाऊ शकतात. भारतात आल्यावर इलेक्ट्रिक हैचबैक ला MG च्या बँजिंगसोबत उतरवले जाईल.

या छोट्या कार मॉडेलमध्ये मोडत असल्याने हे खूप छोटे आहे. याला शहरात चालवण्याच्या हिशोबाने बनवण्यात आले आहे. कारमध्ये दोन मोठे दरवाजे देण्यात आले आहे. ज्यामुळे कारमध्ये ड्राइव्हिंग सीटवर बसण्यासाठी उपयुक्त आहेत.

MG Motor India : कारचा लूक एकमद स्टाईलिश आहे. यामध्ये वरच्या बाजूला मोठ्या साइजचा लाइट बार आहे, एक क्रोम स्ट्रिप आहे, जो रियर व्यू मिररजवळ जातो. वैश्विक बाजारात एअर ईवीला स्टीलची चाके देण्यात आली आहेत. मात्र, भारतात लाँच करताना अलॉल व्हील्स किंवा स्टाइलिश व्हील्स या वैशिष्ट्यांसह ही लाँच केली जाऊ शकते.

MG Motor India : बॅटरी पॉवर 20 ते 25 KWH असू शकतो. एकदा चार्च केल्यानंतर जवळपास 150 किमी ड्राइविंग रेंज मिळू शकते. इलेक्ट्रिक मोटारन पॉवर उत्पादन 40 BHP असण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही कार शहरात वापरण्यासाठी अत्यंत लवचिक असेल, असे म्हटले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT