पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि टेनिस स्टार नोवाक जोकोविच यांची स्पेनला जाताना विमानात भेट झाली. या भेटीवर स्टॅलिन यांनी आनंद व्यक्त केला आहे. या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत या फोटोला त्यांनी " आकाशात आश्चर्य" असे कॅप्शन दिले आहे. टेनिस स्टार नोवाक यांनी २४ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन मिळवले आहे. त्यांच्या भेटीनंतर आनंद व्यक्त करत स्वतःचा फोटो शेअर केला आहे. CM MK Stalin – Novak Djokovic
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन राज्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी 8 दिवसांच्या स्पेन दौऱ्यावर नुकतेच रवाना झाले आहेत. परदेश दौऱ्यादरम्यान, ते ROCA आणि Gestamp यासह काही मोठ्या औद्योगिक कंपन्या आणि गुंतवणूक संस्था इन्व्हेस्ट इन स्पेन यांच्याशी चर्चा करणार आहेत, असे पीटीआयने सांगितले. CM MK Stalin – Novak Djokovic
नोव्हाक जोकोविच त्यांच्या ऑस्ट्रेलियन ओपन आणि युनायटेड कप साठी गेल्या काही आठवड्यांपासून ऑस्ट्रेलियात होते. मेलबर्नमध्ये शुक्रवारी मोसमातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत अंतिम चॅम्पियन जॅनिक सिनरकडून सर्बचा पराभव झाला. नोवाक ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 33 सामन्यात विजयी मिळवत पुरुष एकेरीचा मुकुट मिळवला होता. मात्र, सिन्नरने 4 सेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोकोविचचा 4 वर्षांची विजयी मालिका संपुष्टात आणली.
हेही वाचा