पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत राहणाऱ्या मूळच्या भारतीय उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्या मोना पटेल यांनी नुकताच मेट गाला २०२४ मध्ये डेब्यू केला. त्यांनी इव्हेंटमध्ये उपस्थितांची मने जिंकली. (Met Gala Mona Patel) आता सोशल मीडियावर मोना पटेल यांचे फोटो व्हायरल होत आहेत. या इव्हेंटसाठी मोना पटेल यांना प्रसिद्ध अमेरिकन फॅशन स्टायलिस्ट लॉ रोचने स्टाईल केलं होतं. पटेल यांनी आपल्या ड्रेसने सर्वांना आश्चर्यचकीत केलं. 'द गार्डन ऑफ टाईम'शी या इव्हेंटची थीम जुळत होती. (Met Gala Mona Patel)
भारतात डिझायनर आयरिस व्हॅन हर्पेनच्या टीमकडून तयार करण्यात आलेल्या फ्लोर-लेंथ ड्रेसमध्ये एक शानदार फुलपाखरूच्या आकाराचा कोर्सेट लावलं होतं. ड्रेस मागून खूप लॉन्ग होता.
ज्यामध्ये मेकॅनिकल फुलपाखरू लावले होते, मोना पटेल यांच्या प्रत्येक पाऊलाला मेकॅनिकल फुलपाखरू आपले पंख फडफडताना दिसत होते. त्यांनी कायनेटिक मोशन आर्टिस्ट केसी करन याांच्या मदतीने ३ डी फुलपाखरू स्वत: डिझाईन केले होते.
मोना पटेल यांचा जन्म गुजरातच्या वडोदरामध्ये झाला. २००३ मध्ये त्या न्यू जर्सीतील रटगर्स विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिका गेल्या. वयाच्या २२ व्या वर्षी टेक्सासच्या डलास येथे गेली. हेल्थकेयर, टेक आणि रिअल इस्टेट सारख्या उद्योगांमध्ये ८ कंपन्यांची स्थापना केली.
ज्यामध्ये हेल्थ-टेक स्टार्टअप रेडएक्सई, केअरफर्स्ट इमेजिंग आणि सामुदायिक समूह हाउते माइंडसेटचा समावेश आहे. त्यांच्या इन्स्टाग्रामनुसार, मोना पटेल यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूल, स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस आणि एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतले आहे.
२०२१ मध्ये मोना पटेल यांचे नाव फोर्ब्सच्या द नेक्स्ट एक हजार यादीत सहभागी झालं होतं.