Latest

Merry Christmas : कॅटरिना कैफ-विजय सेतुपतीचे ‘नजर तेरी तुफान’ गाणे रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर "मेरी ख्रिसमस" ची हवा सोशल मीडियावर सुरु आहे. (Merry Christmas) या चित्रपटातील "नजर तेरी तुफान" हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. (Merry Christmas)

संबंधित बातम्या –

मनमोहक चाल आणि मनमोहक गीतांनी हे गाणे संगीत उद्योगात धुमाकूळ घालत आहे. प्रख्यात संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती यांनी "नजर तेरी तुफान" हे गाणं संगीतबद्ध केलेले आहे. पापोनने हे गाणे सुंदर गायले आहे आणि प्रख्यात गीतकार वरुण ग्रोव्हर यांनी हे गाणं लिहिलं आहे.

श्रीराम राघवनच्या चित्रपटात संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काझमी, टिन्नू आनंद, अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात बघायला मिळणार आहे. १२ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तमिळ आवृत्तीमध्ये, कॅटरिना आणि विजय राधिका सरथकुमार, गायत्री, षणमुगराजन, काविन जय बाबू आणि राजेश विल्यम्ससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

विजय सेतुपतीचे केले कॅटरिनाचे कौतुक

"मेरी ख्रिसमस" या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पत्रकार परिषद चर्चेचा विषय ठरली. यावेळी कॅटरिना कैफला तिचा सहकलाकार अभिनेता विजय सेतुपती यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली आहे.

कॅटरिनाच्या अभिनय कौशल्याची आणि व्यावसायिकतेची प्रशंसा करताना तो म्हणाला, "कतरिना ची काम करण्याची पद्धत पाहून मी थक्क झालो आहे. ती एक उत्तम व्यावसायिक आणि उत्तम अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करताना खूप आनंद झाला."

या पत्रकार परिषदेत "नजर तेरी तुफान" हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. प्रख्यात संगीतकार प्रीतम चक्रवर्ती आणि गीतकार वरुण ग्रोव्हर यांनी संगीतबद्ध केलेल हे खास गाणं प्रसिद्ध गायक पापोन यांनी गायलं आहे.

कॅटरिनाच्या तमिळ पदार्पणासाठी हा चित्रपट उल्लेखनीय ठरणार आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित "मेरी ख्रिसमस," १२ जानेवारी, २०२४ रोजी हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा काझमी, टिन्नू आनंद, अश्विनी काळसेकर आणि राधिका आपटे प्रमुख भूमिकेत आहेत. तर तमिळमध्ये कॅटरिना आणि विजय सेतुपतीसह राधिका सरथकुमार, गायत्री, षण्मुगराजन, काविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स दिसणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT