Latest

MEGA BLOCK : कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी २७ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य रेल्वे मुंबई विभाग दि. १९/२०  नोव्हेंबर २०२२ रोजी अप आणि डाउन धिम्या मार्गावर, अप आणि डाउन जलद मार्गांवर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मस्जिद स्टेशन दरम्यान किमी 0/1-2 येथे रोड क्रेन वापरून कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (MEGA BLOCK ) परिचालीत करणार आहे. याबबत सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून प्रसिद्ध करण्यात आले आहे.  वाचा सविस्तर बातमी.

MEGA BLOCK  : ब्लॉक तपशील खालीलप्रमाणे 

ब्लॉक कालावधी

  • अप आणि डाउन धिम्या मार्गावर:

शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी २३:०० वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजी च्या १६:०० वाजेपर्यंत =          १७.०० तासांचा ब्लॉक.

  • अप आणि डाउन जलद मार्गावर:
    शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी २३:०० वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजी च्या १६:०० वाजेपर्यंत = १७.०० तासांचा ब्लॉक.
  • अप आणि डाउन हार्बर मार्गावर:
    शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी २३:०० वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजीच्या २०:०० वाजेपर्यंत = २१.०० तासांचा ब्लॉक.
  • सातवी मार्गिका आणि यार्ड:
    शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी २३:०० वाजल्यापासून ते रविवार दि. २१.११.२०२२ रोजीच्या ०२:०० वाजेपर्यंत = २७.०० तासांचा ब्लॉक.

रेल्वे सेवा चालू राहणार नाहीत 

अप आणि डाउन हार्बर मार्ग: वडाळा रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

अप आणि डाउन धिम्या मार्गावर: भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

अप आणि डाउन जलद मार्गावर: भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

रेल्वे सेवांवर परिणाम

MEGA BLOCK : उपनगरीय गाड्यांचे रद्दीकरण

• ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत.

• मुख्य मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट होतील. भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.

• हार्बर लाईनवरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील. वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.

• रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा उपलब्ध नसतील.
बृहन्मुंबई महानगर पालिकेला ब्लॉक प्रभावित भागात पुरेशा बसेस चालवण्याची विनंती केली आहे.

MEGA BLOCK  : मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे रद्दीकरण

ट्रेन 19.11.2022 रोजी मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्दीकरण

दि. १९.११.२०२२ रोजी रद्द ट्रेन

1) 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
2) 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस
3) 12702 हैदराबाद – मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस
4) 12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस
5) 17058 सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे
6) 17412 कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस
7) 17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस
8) 12187 जबलपूर – मुंबई गरीबरथ

दि. २०.११.२०२२ रोजी गाड्यांचे रद्दीकरण

1) 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस
2) 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
3) 11007 मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस
4) 12071 मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस
5) 12188 मुंबई – जबलपूर गरीबरथ
6) 11009 मुंबई – पुणे सिंहगड एक्सप्रेस
7) 02101 मुंबई – मनमाड विशेष
8) 12125 मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे
9) 11401 मुंबई – आदिलाबाद एक्सप्रेस
10) 12123 मुंबई – पुणे डेक्कन क्वीन
11) 12109 मुंबई – मनमाड पंचवटी एक्सप्रेस
12) 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस
13) 12111 मुंबई – अमरावती एक्सप्रेस
14) 17411 मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
15) 11010 पुणे – मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
16) 12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन
17) 12110 मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस
18) 12126 पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेल मार्गे
19) 02102 मनमाड – मुंबई स्पेशल
20) 12072 जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
21) 17057 मुंबई – सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे
22) 12701 मुंबई – हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस
23) 11008 पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस
24) 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
25) 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस

दि. २१.११.२०२२ रोजी गाड्यांचे रद्दीकरण

1) 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस
2) 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
3) 11402 आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस

डाउन ट्रेन्सचे शॉर्ट ओरीजनेशन

दि.१९.११.२०२१ रोजी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या
1) 22157 मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस
2) 11057 मुंबई – अमृतसर एक्सप्रेस

दि.२०.११.२०२१ रोजी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 22177 मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस
2) 12051 मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस
3) 22105 मुंबई – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
4) 22119 मुंबई-करमळी तेजस एक्सप्रेस
5) 12859 मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेस
6) 12534 मुंबई – लखनौ जंक्शन पुष्पक एक्सप्रेस
7) 12869 मुंबई – हावडा एक्सप्रेस
8) 22159 मुंबई – चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस
9) 11019 मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस
10) 22732 मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस
11) 22221 मुंबई – निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
12) 12261 मुंबई – हावडा दुरांतो एक्सप्रेस
13) 12105 मुंबई – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस
14) 12137 मुंबई – फिरोजपूर पंजाब मेल
15) 12289 मुंबई – नागपूर दुरांतो एक्सप्रेस
16) 22107 मुंबई – लातूर एक्सप्रेस
17) 12809 मुंबई – हावडा मेल नागपूर मार्गे
18) 12322 मुंबई – हावडा मेल प्रयागराज छिवकी मार्गे
19) 22157 मुंबई – चेन्नई एग्मोर एक्सप्रेस
20) 11057 मुंबई – अमृतसर एक्सप्रेस

दि.२१.११.२०२१ रोजी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 22177 मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस

दि.२०.११.२०२१ रोजी नाशिक रोड येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस

पनवेल येथून सुटणाऱ्या गाड्या

1) 10111 मुंबई – मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी
2) 10103 मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी
3) 12133 मुंबई-मंगळुरु जं. एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी
4) 10111 मुंबई – मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी

पुणे येथून दि. २०.११.१०२२ रोजी सुटणाऱ्या गाड्या

1) 11301 मुंबई- केएसआर बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस
2) 11029 मुंबई – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
3) 16331 मुंबई- तिरुवनंतपुरम एक्सप्रेस
4) 11139 मुंबई- गदग एक्सप्रेस
5) 12115 मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस

MEGA BLOCK  : अप ट्रेन्सचे शॉर्ट टर्मिनेशन

दि. १८.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होतील

1) 12533 ​​लखनौ जंक्शन – मुंबई पुष्पक एक्सप्रेस
2) 12870 हावडा – मुंबई एक्सप्रेस
3) 11058 अमृतसर – मुंबई एक्सप्रेस
4) 11020 भुवनेश्वर – मुंबई कोणार्क एक्सप्रेस
5) 12810 हावडा – मुंबई मेल नागपूर मार्गे
6) 12138 फिरोजपूर – मुंबई पंजाब मेल
7) 12321 हावडा – मुंबई मेल प्रयागराज छिवकी मार्गे

दि. १९.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होतील

1) 22106 पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
2) 12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
3) 22120 करमळी-मुंबई तेजस एक्सप्रेस
4) 11402 आदिलाबाद – मुंबई एक्स्प्रेस
5) 22158 चेन्नई सेंट्रल – मुंबई एक्सप्रेस
6) 12106 गोंदिया – मुंबई विदर्भ एक्सप्रेस
7) 22144 बिदर – मुंबई एक्स्प्रेस
8) 11058 अमृतसर – मुंबई एक्सप्रेस
9) 12533 लखनौ जं. – मुंबई पुष्पक एक्सप्रेस
10) 12290 नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस
11) 22178 वाराणसी – मुंबई महानगरी एक्सप्रेस
12) 22222 ह. निजामुद्दीन – मुंबई राजधानी एक्सप्रेस
13) 22160 चेन्नई सेंट्रल – मुंबई एक्सप्रेस
14) 22731 हैदराबाद – मुंबई एक्सप्रेस
15) 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस

दि. २०.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होतील

1) 22120 करमळी – मुंबई तेजस एक्सप्रेस
2) 12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
3) 22106 पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस.

दि. १९.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या नाशिक रोड येथे शॉर्ट टर्मिनेट होतील

1) 22140 नागपूर – मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस

पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या ट्रेन्स 

1) 10104 मडगाव – मुंबई मांडवी एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी सुटणारी ट्रेन.
2) 12134 मंगळुरु जं. – मुंबई एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी सुटणारी ट्रेन.
3) 10112 मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी सुटणारी ट्रेन.
4) 10104 मडगाव – मुंबई मांडवी एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी सुटणारी ट्रेन

दि. १९.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील ट्रेन पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट होतील

1) 11140 गदग- मुंबई एक्सप्रेस
2) 12116 सोलापूर – मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस
3) 16332 तिरुवनंतपुरम – मुंबई एक्सप्रेस
4) 11302 केएसआर बेंगळुरू – मुंबई उद्यान एक्स्प्रेस
5) 11030 कोल्हापूर – मुंबई कोयना एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी सुटणारी.

MEGA BLOCK : प्रवाशांसाठी मदत कक्ष 

प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख जंक्शन आणि स्टेशनवर पुरेसे परतावा खिडक्या (रिफंड काउंटर) उघडल्या जातील.
प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी मदत कक्षही सुरू करण्यात येणार आहे. चौकशीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा

या ब्लॉकमुळे होणाऱ्या ट्रेन्सच्या परीचालनाची बदलांची प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT