Latest

KDCC ELECTION : कोरे-पी.एन.-आवाडे यांच्यात बैठक; ‘बिनविरोध’च्या द़ृष्टीने पहिले पाऊल

backup backup

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा बँक निवडणुकीत अधिकाधिक जागा बिनविरोध करण्याच्या द़ृष्टीने हालचाली वेगावल्या आहेत. आ. पी. एन. पाटील आणि आ. विनय कोरे हे दोघे आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा करणार आहेत. यासाठी या तिघांची गुरुवारी किंवा शुक्रवारी कोल्हपुरात बैठक होत आहे. (KDCC ELECTION)

विधान परिषद निवडणूक टोकाचा विरोध असूनही बिनविरोध झाली. त्यामुळे राजकारणात अशक्य असे काहीच नसते, असे सूचक वक्तव्य करत आ. प्रकाश आवाडे यांनी जिल्हा बँकेसाठी प्रक्रिया आणि बँक-पतसंस्था गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पुढील निर्णय सर्व नेते एकत्रित बसून होईल. त्यानंतरचा निर्णय त्या-त्यावेळी होईल, असे सूचक संकेतही आ. आवाडे यांनी दिले होते.

दरम्यान, अधिकाधिक जागा बिनविरोध करताना आ. पी.एन. पाटील आणि कोरे यांच्यावर आवाडे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी आहे. मागील निवडणुकीत आवाडे गट काँग्रेससोबत होता. इतर मागास प्रतिनिधी गटातून विलासराव गाताडे हे आवाडे गटाचे उमेदवार होते. आता आ. प्रकाश आवाडे यांनीच मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. कोरे यांचा विरोध असलेल्या बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्या प्रक्रिया गटातून आणि कोरे यांची आणखी एका जागेसाठी मागणी होऊ शकेल, अशा पतसंस्था आणि बँक गट अशा दोन गटांतून या पार्श्वभूमीवर कोरे-पी.एन.-आवाडे यांच्या बैठकीला महत्त्व आले आहे. (KDCC ELECTION)

आम्ही तिघे गुरुवारी किंवा शुक्रवारी कोल्हापुरात एकत्र बैठक घेऊन चर्चा करणार आहोत. आमदार प्रकाश आवाडे
कोणत्या गटातून निवडणूक लढवणार, याबाबत प्रामुख्याने या बैठकीत चर्चा करण्यात येईल. या बैठकीनंतर सर्व नेत्यांशी एकत्रित बैठक होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल.

– आ. पी. एन. पाटील

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT