Latest

Transformer Blast : ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटाने रायपूरमध्ये अग्नितांडव! वीज विभागाचे गोदाम जळून खाक

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Transformer Blast : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील विद्युत विभागाच्या उपविभागीय कार्यालयाला शुक्रवारी अचानक भीषण आग लागली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केल्याने आकाशात दूरवर धुराचे लोट दिसत होते. आग वाढत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरमधील गुढियारी पोलीस स्टेशन हद्दीतील भारत माता चौकाजवळील विद्युत विभागाच्या उपविभागीय कार्यालयाच्या गोदामात ठेवलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. गोदामात ठेवलेले 1500 ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाले. गोदामात सुमारे 6 हजार ट्रान्सफॉर्मर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आगीने रौद्ररुप धारण केल्याने परिसरातील सर्व घरे रिकामी करण्यात आली.

SCROLL FOR NEXT